रस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका

रस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोकारस्त्यालगतची उघडी विहीर ठरतेय जीवघेणी; तातडीने उपाययोजना न केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका

भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी

भडगाव (ता. भडगाव) : कजगाव येथील गट क्रमांक 127/1/A, शंकर नगर परिसरातील कॉलनी रस्त्यालगत असलेली कठडाविना उघडी विहीर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सदर विहीर रस्त्याच्या अगदी कडेला असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी ही विहीर गंभीर संकट ठरत आहे.

राज्यात यापूर्वी अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असताना, कजगावमधील ही परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील लहान मुले खेळताना वारंवार विहिरीजवळ जातात. तसेच रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने विहिरीच्या अत्यंत जवळून जात असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून विहिरीभोवती सुरक्षित कठडा उभारावा किंवा विहीर तातडीने बुजवून टाकावी, अशी ठोस मागणी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने विलंब न करता त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढला

कजगाव बसस्थानक व स्टेशन रोडवर अतिक्रमणाचा विळखा; अपघातांचा धोका वाढला

अमीन पिंजारी भडगाव ता प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील कजगाव हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्यामुळे येथे दररोज नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, बसस्थानक परिसर व स्टेशन रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही दुकानदारांनी दुकानांसमोर अनधिकृत अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहन पार्किंग होत असल्याने स्टेशन रोड मोठ्या प्रमाणात अरुंद झाला आहे. परिणामी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हा मार्ग बसस्थानक चौफुलीपासून जुने गाव, रेल्वे स्थानक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे सतत वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत अतिक्रमण व अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असून लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.

काही अपघातांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वाढत्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देत अतिक्रमण हटविणे, बेशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाई करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मोठा अपघात होण्यापूर्वीच संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कारसोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी

कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी

कासोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभीकारसोदा ग्रामपंचायतीत स्वच्छ भारत मिशनची फज्जा; लाखोंची ई-रिक्षा धूळ खात उभी

शैलेश पांडे कासोदा प्रतिनिधी :-

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कारसोदा ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी देण्यात आलेली लाखो रुपयांची ई-रिक्षा सध्या पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या मते, गावातील स्वच्छता व्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओला व सुका कचरा संकलनासाठी ही ई-रिक्षा सुरुवातीला काही दिवस वापरात होती. मात्र, त्यानंतर ती ग्रामपंचायत कार्यालयामागील परिसरात उभी करण्यात आली असून आज तिच्यावर धुळीचा जाड थर साचलेला दिसून येतो. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित होत आहेत.

स्थानिकांनी सांगितले की, देखभाल खर्च, बॅटरी चार्जिंगच्या अडचणी, वाहन पलटी होण्याच्या घटना तसेच चालक व मानधनाची व्यवस्था नसल्यामुळे ही वाहने बंद पडली आहेत. परिणामी, सध्या गावात कचरा संकलन ट्रॅक्टर व घंटागाडीच्या माध्यमातून केले जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेकडून वाहन पुरविल्यानंतर त्याच्या वापराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उघड्यावर ठेवलेल्या वाहनामुळे त्याचे तांत्रिक नुकसान होत असून संपूर्ण स्वच्छता यंत्रणा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, “जनतेच्या पैशातून घेतलेली वाहने वापरात नसतील तर हा निधीचा अपव्यय नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन वाहन दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणावे, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!!

भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.!!!भडगाव ते वाडे मुक्कामे बससह ३ बस फेर्या अचानक बंद. भडगाव बस स्थानकास पञकार श्री. अशोक बापु परदेशी यांचे निवेदन.

भडगाव :-

भडगाव ते वाडे एस टी सायंकाळची मुक्कामे बस सह ३ बस फेर्या जवळपास १९ ते २० दिवसापासुन भडगाव बसस्थानकातुन अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. वाडे गावासह या ईतर गावांसाठी दिवसातुन दुपारी दिड वाजेची एकच बस सुरु आहे. ही मोठी शोकांतीका बनलेली आहे. यामुळे वृद्ध मंडळींसह प्रवाशी वर्गाचे प्रवासासाठी मोठे हाल होत आहेत. तरी भडगाव ते वाडे बंद सायंकाळची बसफेरीसह इतर २ बस फेर्याही तात्काळ सुरु करण्यात याव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने प्रवाशांसह भडगाव येथे आंदोलन छेडले जाईल अशा इशार्याचे निवेदन पाचोरा आगार प्रमुखांसह भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक यांना वाडे येथील नागरीक, पञकार श्री.अशोक बापु परदेशी यांनी दि. २ रोजी सायंकाळी भडगाव बसस्थानकात भेट घेऊन चर्चा करुन दिलेले आहे.

भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे कि, वाडे गावासह भडगाव ते वाडे दरम्यान सर्वच गावातील प्रवाशी, नागरीकांच्या मागणीनुसार व बस सेवेचा लाभ प्रवाशांना तात्काळ मिळावा म्हणुन विनंती अर्ज केल्याचे म्हटलेले आहे. भडगावहुन सकाळी ८.३०वाजता वाडे येथे सुटणारी बस, सायंकाळी ४.४५ वाजता सुटणारी बस, तसेच सायंकाळची वाडे येथे मुक्कामी सुटणारी बस अशा एकुण ३ बस फेर्या दि. १३/४/२०२६ म्हणजे १९ ते २० दिवसापासुन अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वृद्ध मंडळी, प्रवाशी वर्गाचे भडगावी तालुक्याच्या विविध कामांसाठी वा भडगावहुन वाडे मार्गाने जाणार्या प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल होतांना दिसत आहेत. प्रवाशांना खाजगी वाहनाने जादा आर्थिक भुर्दंड सहन करुन प्रवास करावा लागत आहे. तरी भडगाव ते वाडे बंद मुक्कामे बससह इतर बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.बस सेवेचा लाभ दयावा. अशी मागणी वाडे, टेकवाडे बुद्रुक, नावरे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव, दलवाडे, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, वढधे, भडगाव आदि गावातील प्रवाशी वर्ग व नागरीकातुन होत आहे.

अन्यथा लोकशाही मार्गाने प्रवाशांसह भडगावी आंदोलन छेडले जाईल.सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री.अशोक बापु परदेशी यांची सही आहे.

अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त.!!!

अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्तअवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त

पाचोरा : जारगाव चौफुली येथे अवैधरित्या गॅस सिलिंडरचा साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभाग आणि पाचोरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 18 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी अकबर मशिदखान (वय 38, रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, 2 मे 2026 रोजी तहसील कार्यालयात नियमित कामकाज सुरू असताना जारगाव चौफुली येथे एका गोडाऊनमध्ये अवैध गॅस सिलिंडरचा साठा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे दुपारी सुमारे 1 वाजता छापा टाकला.

या कारवाईत एकूण 18 गॅस सिलिंडर आढळून आले. त्यापैकी 14 व्यवसायिक तर 4 घरगुती सिलिंडर होते. तसेच 9 सिलिंडर भरलेले आणि 9 रिकामे असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये विविध कंपन्यांचे सिलिंडर असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 62 हजार 400 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अकबर मशिदखान याने सर्व सिलिंडर स्वतःचे असल्याची कबुली दिली. त्याचा जबाब नोंदवून पंचनामा करण्यात आला असून जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्वलनशील गॅसचा बेकायदेशीर साठा करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 287 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पुरवठा निरीक्षक राहुल पवार, लिपिक शुभम सपकाळे, सोमनाथ मिस्तरी, भाग्यश्री देवढे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी आणि इतर कर्मचारी सहभागी होते. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गॅस साठेबाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान.!!!

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसानकजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

अमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी :-

कजगाव (ता. भडगाव) : कनाशी रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारात रविवारी (ता. ३) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीने परिसरात मोठी खळबळ उडाली. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत उंचच उंच ज्वाळा उसळल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या भीषण आगीत शेतकरी सचिन पाटील यांचे सुमारे चार बिघे मका, चार बिघे शाळू पीक आणि अडीच एकर मोसंबी बाग पूर्णतः जळून खाक झाली. तसेच रत्नाबाई पाटील यांचा तेरा एकरांवरील बांबू नष्ट झाला. याशिवाय स्वप्निल पाटील व राकेश पाटील यांचा तेरा एकर बांबू, शेततळे, ठिबक सिंचन व्यवस्था आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेत बापू भोई यांच्या शेतातील ठिबक सिंचन व पाइपलाइन जळून नष्ट झाली, तर रमेश वाणी यांच्या शेतातील ठिबक सिंचन, गुरांचा चारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्यही आगीत भस्मसात झाले. या आगीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

आगीचे भीषण स्वरूप पाहता स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र, या प्रक्रियेत मोठे नुकसान टाळता आले नाही.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात आगीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्त

जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्त

जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्तजळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर पोलिसांचा मोठा प्रहार,२५ आरोपींवर गुन्हे; ७८ जनावरे सुटका, ४६३ किलो गोमांस जप्त

जळगाव प्रतिनिधी:-

जळगाव जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व कत्तल करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या कारवाईत जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५ व २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली. धरणगाव, यावल, भडगाव, रावेर, चाळीसगाव, सावदा, पाचोरा, एरंडोल, कासोदा, अडावद, पहूर आदी भागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी एकूण १४ वाहने जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत ४६ लाख १० हजार रुपये इतकी आहे. तसेच ७८ जिवंत गोवंश (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी) यांची सुटका करण्यात आली. अवैधरीत्या कत्तल केलेले सुमारे ४६३ किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १५ लाख २३ हजार २३० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

याप्रमाणे एकूण कारवाईची आर्थिक उलाढाल सुमारे ६१ लाख ३३ हजार २३० रुपये इतकी असून, जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक व कत्तल साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) व संदीप गावीत (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत ही मोहीम यशस्वी केली.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर मोटार परिवहन विभागामार्फत स्वतंत्र दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. जिल्ह्यात गोवंश वाहतूक, विक्री व कत्तल करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त

अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त.!!!अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथे 18 सिलिंडर जप्त

पाचोराप्रतिनिधी :-

जारगाव चौफुली येथे अवैधरित्या गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभाग आणि पाचोरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 18 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी अकबर मशिदखान (वय 38, रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे 2026 रोजी तहसील कार्यालयात नियमित कामकाज सुरू असताना जारगाव चौफुली येथे अकबर मशिदखान यांच्या घराखालील गोडाऊनमध्ये अवैध गॅस हंड्यांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच राहुल पवार यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळी धाव घेत दुपारी सुमारे 1 वाजता छापा टाकला.

छाप्यात एकूण 18 गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये 14 व्यवसायिक आणि 4 घरगुती सिलिंडरचा समावेश होता. 9 सिलिंडर भरलेले तर 9 रिकामे होते. जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये HP, GAS-ONE, BPCL, HPCL आणि 3PCL कंपनीच्या गॅस हंड्यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 62 हजार 400 रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अकबर मशिदखान याला याबाबत विचारणा केली असता, सर्व सिलिंडर स्वतःच्या मालकीचे असल्याची कबुली त्याने दिली. त्याचा जबाब नोंदवून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला.

या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 287 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल पवार, लिपिक शुभम सपकाळे, लिपिक सोमनाथ मिस्तरी, लिपिक भाग्यश्री देवढे मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गॅस साठेबाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन

जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन

जिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहनजिद्द आणि इच्छाशक्तीने उंची गाठा – आमदार किशोर पाटील यांचे आवाहन

भडगाव जावेद शेख : –

“दिव्यांगत्व हे अडथळा नसून जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते. शासन तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पंचायत समीती शिक्षण विभागामार्फेत अलीमको शिबिरातल दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहुन दिव्यांग विध्यार्थ्यांना संबोधतांना केले.

समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आज आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. शासनाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यासाठी मोठी मदत मिळणार असून त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडणार आहे.

यावेळी व्यासपिठावर आमदार किशोर पाटील,शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील,गटविकास अधिकारी बी.के.अंजने,गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,भडगाव लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे,उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील,गटनेते लखीचंद पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील,नगरसेवक युवराज पाटील,समाधान पाटील,पुरुषोत्तम सोनवणे,स्विय सहाय्यक राजेंद्र पाटील व सुनिल पाटील हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते हेलर केलर व लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.यावेळी शिक्षण विभागातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी भडगाव तालुक्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना शेक्षणिक किट,सि.पी.चेअर,व्हिल चेअर,कर्णयंञ आदी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आमदार किशोर पाटील यांनी तुम्हाला आलेल्या दिव्यांगत्वावर मात करा,शिका आणी यशस्वी व्हा.मतदार संघाचा पालक म्हणुन मी सदैव तुमच्या सोबत आहे.असे आश्वासन दिले.त्यांच्या या आश्वासनाने दिव्यांग विद्यार्थी व पालकांच्या चेहर्‍यावर आनंद आणी सआधान दिसुन आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुञसंचलन व आभार गणेश देशमुख यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी किशोर पुजारी,लक्ष्मण खैरनार,टिकाराम पाटील, मनोहर माळी, मिलिंद सोनवणे,जितेंद्र माने,शिवाजी भोसले,किशोर पाटील,वर्षा पाटिल,छाया महाजन,छाया देसले,छाया ढोले यांनी परिश्रम घेतले.

भडगाव तालुक्यात तलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद,पोलिसांची धाडसी कारवाई; तलवार जप्त

तलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद,भडगाव पोलिसांची धाडसी कारवाई; तलवार जप्त

 तलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद

भडगाव पोलिसांची धाडसी कारवाई; धारदार तलवार जप्तभडगाव तालुक्यात तलवार फिरवत दहशत माजवणारा इसम जेरबंद,पोलिसांची धाडसी कारवाई; तलवार जप्त

भडगाव, दि. २ मे — शहर व परिसरात तलवार फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला भडगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, वडजी (ता. भडगाव) येथे एक इसम उघडपणे तलवार घेऊन फिरत असून दहशत निर्माण करत आहे. माहिती मिळताच पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे २ फूट ७ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. जप्त तलवार धारदार असून तिचा वापर करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरद उत्तम गायकवाड (वय २९, रा. वडजी, ता. भडगाव) असे आहे. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १८८, ५०४, ५०६ तसेच शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह गोवर्धन बोरसे, निलेश ब्राम्हणकर, भूषण पाटील, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत, हंसराज देशमुख व संदीप सोनावणे यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखता येईल.

Don`t copy text!