गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

65 / 100 SEO Score

गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईगॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी :-

फैजपूर व वरणगाव परिसरातील गॅस एजन्सींच्या गोडाऊनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.

फैजपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८/२०२६ व वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

काय घडले होते.?दि. २५ एप्रिल रोजी फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी त्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून ३.११ लाख रुपये किमतीचे १०० भरलेले गॅस सिलेंडर चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती.

तसेच, दि. २६ फेब्रुवारी रोजी वरणगाव येथेही अशाच प्रकारे ५७ गॅस सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार भारत गॅस वितरक नरेंद्र अहिरे यांनी नोंदवली होती.

तपासात मिळाले यश,दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथके तयार केली होती.

गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला. त्यातून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची नावे

शेख बिलाल शेख नबी (रा. कासोदा, ता. एरंडोल)

वसीम खान शाबीर खान (रा. तांबापुरा, जि. जळगाव)

चेतन सुरेश काळे (रा. नशिराबाद, ता. भुसावळ)

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे.

जप्त मुद्देमाल

६२ भरलेले गॅस सिलेंडर – ₹१,५५,०००

९५ रिकामे गॅस सिलेंडर – ₹१,४२,५००

सुझुकी बर्गमन मोपेड – ₹१,३०,०००

एकूण: ₹४,२७,५००

पुढील तपास सुरू

अटक आरोपींना फैजपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!