भडगाव प्रतिनिधी:-
येथील श्री. दत्त मंदिरात श्री. गुरुचरीञ पारायण व दत्त याग सोहळयाचे आयोजन दि. २८ पासुन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता दि. ५/१२/२०२५ रोजी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणाचे वाचक हभप. धनंजय महाराज ऋषीपांथा बहाळ हे आहेत. तसेच दि. ४ रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथश्री श्री. गुरुचरीञ यांची मिरवणुक निघणार आहे. सकाळी १० वाजता हभप. पारस महाराज बनोटी यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. ५ रोजी सकाळी ९ वाजता हभप. चेतन महाराज मालेगाव यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आव्हान श्री. गुरुदत्त सेवा मंडळ ग्रामस्थ, भजनी मंडळ वाडे या आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
