मोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

56 / 100 SEO Score

मोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहातमोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

मोंढाळे ता. पाचोरा :

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “आपला महाराष्ट्र” सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी तसेच त्यांना आपल्या जिल्ह्याची सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने दि. 4 एप्रिल 2026 रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. “आपला महाराष्ट्र” या विषयावर आधारित 30 प्रश्नांची ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्कृष्ट कामगिरी केली.

शनिवारी सकाळी 8:10 वाजता आयोजित छोटेखानी समारंभात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, लेखन साहित्य, लेखन पॅड व कंपास बॉक्स देऊन गौरविण्यात आले.

यावेळी SMC सदस्य तथा शिक्षणप्रेमी धनराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ सोनवणे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विशेष म्हणजे, स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेली प्रमाणपत्रे पदवीधर शिक्षक राजेंद्र कोळी यांनी स्वतःच्या घरी फोटो पेपरवर रंगीत प्रिंट काढून तयार केली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपशिक्षक व्यंकट बोरशे, गोपाल पाटील, पदवीधर शिक्षक रविंद्र कुंभार, उपशिक्षिका मीना नेहरकर, राजश्री आहेर तसेच मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!