संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
65 / 100 SEO Score

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहातसंविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आशादीप महिला आधार मंच या विश्वस्त संस्थेतर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्य यांच्या संलग्नतेत आणि ॲड. वर्षाताई देशपांडे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रसेवेसाठी कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रा. अक्षय आंबेडकर आणि आशादीप महिला आधार मंचच्या अध्यक्ष आशा संतोष भोईर यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संयोजन मंगला गुरव यांनी केले. निमंत्रक म्हणून जया गाई, डॉ. मोनिका जगताप, सूरज भोईर, सुरेश साळवी, विजय भोसले, प्रभाकर कांबळे, तानाजी फणसे, संगीता मुख, गौतम खंडागळे, विजय वाघेला, जितेंद्र जोशी आणि ॲड. सोपान बुडबाडकर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी हुंडा न घेण्याची आणि न देण्याची सार्वजनिक शपथ घेतली. सामाजिक बांधिलकी दृढ करणारा हा उपक्रम ठरला. पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, जय महाराष्ट्र पत्रकार संघ, माणुसकी फाउंडेशन आणि मराठी साहित्य व कला सेवा यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले.

कार्यक्रमाच्या समन्वयासाठी कवी व पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, कवी व लेखक मोहन जाधव, योगशिक्षक संतोष खरटमोल, शिक्षिका मनीषा मांढरे, विकास कदम, संतोष तांबे, विनायक जवळेकर, विजय केदासे आणि अभिनेत्री निशा जाधव यांनी योगदान दिले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संयोजक सूरज भोईर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!