IMG 20260717 WA1342

धुळे एलसीबीची धडक कारवाई : 16 किलो 664 ग्रॅम गांजासह 9.12 लाखांचा मुद्देमाल जप्त

56 / 100 SEO Score

धुळे एलसीबीची धडक कारवाई : 16 किलो 664 ग्रॅम गांजासह 9.12 लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी अटकेत; एक फरार, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

धुळे जिल्हा प्रतिनिधी :- फईम शाह 

धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 16 किलो 664 ग्रॅम गांजा व मारुती सुझुकी सियाज कार असा एकूण 9 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मारुती सुझुकी सियाज (क्र. MH-47/C-1008) मधून गांजा घेऊन दोन जण धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचे नियोजन केले.

दि. 16 जुलै 2026 रोजी धुळे–शिरपूर महामार्गावरील हॉटेल डी.डी.आर.सी. समोर सापळा रचून संशयित वाहन अडविण्यात आले. राजपत्रित अधिकारी, पंच व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता 16 किलो 664 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत 4 लाख 12 हजार रुपये, तर कारची किंमत 5 लाख रुपये असून एकूण 9 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत विनेश गुलाब पावरा (वय 32) व ताराचंद उत्तरसिंग वळवी (वय 34), दोघे रा. उमर्दा, ता. शिरपूर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी हा गांजा इरफान शकील पिंजारी (रा. शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 211/2026 दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायदा, 1985 मधील संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि अमित माळी तसेच
पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, अमोल पाटील, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राणी
दामोदर, जगदीश सुर्यवंशी व सिध्दार्थ निकम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top