IMG 20260418 WA0833

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, जनावरे जखमी

67 / 100 SEO Score

कजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, जनावरे जखमीकजगाव शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, जनावरे जखमी

भडगाव ता.प्रतिनिधी:- आमीन पिंजारी,

भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारात  सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत रवींद्र राजाराम साठे व गणेश साठे यांच्या सुमारे पाच एकर क्षेत्रातील उभा मका काही क्षणांत जळून खाक झाला.

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेत मक्यासह ठिबक सिंचन व्यवस्था पूर्णतः जळून नष्ट झाली असून, काही जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेजारील शेतकरी प्रविण पाटील यांच्या शेतातील दोन बैल, तसेच अनिल चौधरी यांच्या शेतातील दोन बैल व एक गाय आगीत होरपळून गंभीर जखमी झाले. तसेच मंगलाबाई भिमसिंग पाटील यांच्या शेतातील सुमारे १० ते १५ हजार रुपयांचा मका देखील जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत विहिरीतील पाणी टाकून आग आटोक्यात आणली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top