IMG 20260717 WA1593

कासोद्यात राष्ट्रवादी (अजितदादा गट)ला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश

63 / 100 SEO Score

कासोद्यात राष्ट्रवादी (अजितदादा गट)ला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेशIMG 20260717 WA1546

कासोदा प्रतिनिधी

कासोदा शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे कासोदा शहराध्यक्ष जमीर अली मुंसफ अली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर व विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कासोदा येथे भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाद्वारे शिवसेना व युवासेनेची कासोद्यातील संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शेकडो मुस्लिम बांधवांसह अनेक कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या भव्य कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मनोज पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम तात्या राक्षे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top