खान्देशच्या केळीचा गोडवा पोहचला विदेशात.घुसर्डी खुर्द येथील शेतकर्याचा केळी माल विदेशात निर्यात.काॅलेटीचा माल.३ हजार १०० रुपये मिळाला चांगला भाव.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील घुसर्डी खुर्द हे गाव गिरणा नदीच्या काठावर हिरवळीच्या निसर्गात वसलेले आहे. केळी बागायती गाव म्हणुन गावाची ख्याती आहे. येथील प्रगतीशील शेतकरी रायचंद शामसिंग परदेशी या शेतकर्याचा दर्जेदार काॅलेटीचा माल दि. ३ रोजी श्रीनगर येथे निर्यात झाला असुन केळीला ३ हजार १०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. तर मागील आठवडयातही ईराक, ईराणला केळीचा माल निर्यात झाला आहे. त्यालाही २ हजार ८०० रुपये प्रती क्किंटल असा चांगला भाव केळी मालाला मिळाला आहे. घुसर्डी खुर्द येथील रायचंद शामसिंग परदेशी या शेतकर्याचा चांगला दर्जेदार काॅलेटीचा केळी माल बाॅक्स पॅकींग करुन विदेशात विक्री झाला आहे. खान्देशच्या केळीचा गोडवा पोहचला विदेशात असे समाधानकारक चिञ पहायला मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी कि, भडगाव तालुक्यातील घुसर्डी खुर्द या गावात केळीचे उत्पन्न कष्टाने फुलविणारे अनेक शेतकरी आहेत. या गावात केळीचे मुख्य पिक घेतले जाते. त्यामुळे या गावाची केळी बागायतदार म्हणुन विशेष ओळख आहे.
येथील प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी रायचंद शामसिंग परदेशी यांनी केळी पिक १० हजार केळी पिकाची लागवड एकुण ६ एकर शेतात मागील वर्षी केलेली आहे. आता केळी माल कापणीला सुरुवात झालेली आहे. केळी घडांची रास सरासरी २३ पर्यंत आलेली आहे.केळीचा दर्जेदार काॅलेटीचा माल आकारलेला आहे. दि. ३ रोजी श्रीनगरला केळी माल एक्सपोर्ट , निर्यात झाला आहे. त्याला ३ हजार १०० रुपये प्रती क्किंटल असा चांगला भाव केळी मालाला मिळाला आहे. तर मागील आठवडयातही ईराण, इराक देशात केळीचा माल निर्यात झाला आहे. त्याला २ हजार ८०० असा चांगला भाव मिळाला आहे. हा केळी माल बाॅक्स पॅकींग करुन एक्सपोर्ट झाला आहे. असा आतापर्यंत एकुण अडीचशे क्किंटल केळीचा माल विदेशात निर्यात झाला आहे. असेच चांगले भाव राहीले तर केळीला चांगले उत्पन्न मिळण्याची या शेतकरी कुटुंबाला आशा आहे. आमचा केळीचा माल विदेशात विकला गेला. आणि चांगला भावही केळी मालाला मिळाला याचे समाधान असल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी रायचंद शासमिंग परदेशी यांनी दै. लोकमतशी बोलतांना दिली.
प्रतिक्रीया —
आम्ही घुसर्डी खुर्द शिवारात मागील वर्षी ६ एकर क्षेञात १० हजार केळी रोपांची लागवड केलेली होती. केळीचा दर्जेदार माल तयार झाला आहे. नुकताच केळीचा माल श्रीनगर येथे निर्यात झाला आहे. प्रती क्किंटल ३१०० रुपये चांगला भाव केळी मालाला मिळाला आहे. तर मागील आठवडयातही ईराक, इराण या देशात केळीचा माल निर्यात झाला आहे. त्यालाही प्रती क्किंटल २८०० रुपये असा चांगला भाव मिळाला. असा एकुण अडीचशे क्किंटल माल मोजलेला आहे. असाच भाव राहीला तर केळीचे चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. माञ आमचा केळीचा माल विदेशात विकला गेला याचे समाधान आम्हाला आहे.रायचंद शामसिंग परदेशी. केळी उत्पादक शेतकरी. घुसर्डी खुर्द. ता. भडगाव. जि. जळगाव.





