निसर्गाची किमया न्यारी! वाडे येथे केळीच्या एका घडाला तब्बल २४ फण्या

61 / 100 SEO Score

निसर्गाची किमया न्यारी! वाडे येथे केळीच्या एका घडाला तब्बल २४ फण्या.!!!IMG 20260624 WA0219

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव तालुक्यातील वाडे गावात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. मेहनत, योग्य व्यवस्थापन आणि नियमित देखभालीमुळे त्यांची केळीबाग उत्तम प्रकारे बहरली आहे.

सामान्यतः केळीच्या झाडाला एकच घड येतो. काही वेळा दोन किंवा तीन कंबळे (फण्या) आढळून येतात. मात्र गोठवाळ यांच्या बागेतील एका केळीच्या झाडाच्या घडाला तब्बल २४ फण्या लागल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्मीळ मानला जात असून परिसरातील शेतकरी व नागरिक हा अद्भुत निसर्गचमत्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेताला भेट देत आहेत.

या संदर्भात शेतकरी शांताराम गोठवाळ, नाना गोठवाळ आणि हेमराज परदेशी यांनी सांगितले की, संपूर्ण बागेतील इतर झाडांना नेहमीप्रमाणे घड आले आहेत; मात्र एका झाडावर इतक्या मोठ्या प्रमाणात फण्या लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या अनोख्या घडाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया

“मी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. बागेतील सर्व झाडांना नेहमीप्रमाणे घड आले आहेत. मात्र एका झाडाच्या घडाला तब्बल २४ फण्या लागल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून मलाही आश्चर्य वाटले.”

— शांताराम भगवान गोठवाळ, केळी उत्पादक शेतकरी, वाडे (ता. भडगाव)

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!