शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.मयुरी महाले चार जिल्ह्यांत प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

53 / 100 SEO Score

शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.मयुरी महाले चार जिल्ह्यांत प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

पाचोरा प्रतिनिधी :-

गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा येथील डी.फार्म. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

डी.फार्म. प्रथम वर्षामध्ये कु. मयुरी महाले हिने 85 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने धुळे, जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांमधून प्रथम येण्याचा मान मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कु. माधुरी परदेशी हिने 82.40 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. जागृती पाटील हिने 81.30 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

डी.फार्म. द्वितीय वर्षामध्ये कु. गायत्री पवार हिने 81 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. हर्षदा पाटील हिने 80.55 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. प्रतिभा तेली हिने 80.36 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, संयुक्त सचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे तसेच उपाध्यक्ष श्री. नीरज मुनोत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनी या यशावर न थांबता उच्च शिक्षण आणि करिअरमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे.”

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!