Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

साखरपुडा आला अन् विवाहबंधनात अडकले; दोन कुटुंबांचे नाते झाले अधिक दृढ
साखरपुडा आला अन् विवाहबंधनात अडकले; दोन कुटुंबांचे नाते झाले अधिक दृढ
भडगाव, प्रतिनिधी :-
सोनगीर येथील फैजल शेख मुजीब आणि भडगाव येथील सय्यद अर्शीन इक्बाल यांचा विवाह सोहळा नुकताच उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे साखरपुड्यानंतर अल्पावधीतच हा विवाह सोहळा संपन्न झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विवाह सोहळ्यास दोन्ही बाजूंचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक धार्मिक विधीनुसार नवदाम्पत्याचा निकाह संपन्न झाला. निकाहानंतर उपस्थितांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुख, समृद्धी आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबीयांतील स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा विशेषत्वाने दिसून आला.
यावेळी हाजी जाकीर कुरेशी, साबीर खान (आरटीओ), सलीम शेख, असरार खान, सलीम सय्यद, सुबक्तगीन शेख, डॉ. इस्माईल अली सय्यद, मुश्ताक अहमद, अब्दुल अली, निजाम शेख, ॲड. मोहसीन खान, अल्ताफभाई खत्री, जैनोदिन शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदाम्पत्याचे अभिनंदन करून त्यांना शुभाशीर्वाद दिले.
विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात पाहुण्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. उत्कृष्ट नियोजन आणि आदरातिथ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विवाहानंतर नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती. या विवाह सोहळ्याची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



