श्री. क्षेञ मांडकी येथे देवस्थानावर अमावस्याला भंडारा.विविध धार्मिक कार्यक्रम.
भडगाव वार्ताहर
तालुक्यातील श्रीक्षेञ मांडकी येथे श्री. संत सदगुरु बाळुमामा यांच्या देवस्थानावर दि.१२ रोजी रविवारी अमावस्यानिमित्त परंपरेप्रमाणे भंडार्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी भट्टगाव येथील कै. लखीचंद जयसिंग परदेशी कै. मनुरबाई लखीचंद परदेशी यांच्या स्मरणार्थ विजय लखीचंद परदेशी, मिथुन विजय परदेशी या कुटुंबामार्फत अन्नदानाचा खर्च,
सेवा करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ५ वाजता श्रींचे पदयपुजन व अभिषेक, सकाळी ७.३० वाजता अमावस्या आरती, सायंकाळी ७.३० वाजता अमावशा आरती त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम श्री. संत सदगुरु बाळुमामा यांच्या मंदिरावर होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मांडकी येथील ग्रामस्थ, भाविक भक्त, पुजारी मंडळी, तसेच मंदिराचे पुजारी सुभाष चौधरी यांचेमार्फत करण्यात आले.तरी दर्शन , महाप्रसादासह इतर कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.





