हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत लोणवडी बु. येथे वृक्षारोपण उत्साहात
लोणवडी बु., ता. जळगाव | दि. १० ऑगस्ट २०२६
‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ या संदेशासह हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत वन विभागाच्या वतीने रोटवद येथील नियत क्षेत्र, कक्ष क्रमांक ४३५ मधील रोपवनात सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माननीय वन परिक्षेत्र अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वनक्षेत्र वाढविण्याचे महत्त्व यावेळी उपस्थितांना पटवून देण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास वन परिमंडळ अधिकारी विटनेर बी. एन. पवार, वनरक्षक पळासखेडा श्री. विलास पाटील, वनरक्षक रोटवद श्री. ऋत्विक तडवी, वन समिती अध्यक्ष श्री. बापू लोटण पाटील, श्री. विनायक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच वनसेवक श्री. शरद कोळी, श्री. रामभाऊ मासाळ, श्री. मनोज भुसांडे, श्री. सचिन काळे, मत्स्यसंस्थेचे चेअरमन श्री. राकेश कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य बुऱ्हाण तडवी, मुराद तडवी, तसेच ग्रामस्थ अमोल पाटील, बंटी वाणी, सुनील कोळी, अरुण मिस्तरी, संजू चव्हाण, सुभाष मोरे, दादाभाऊ महाले, रविन इंगळे, मुकडदम मनोज रतन मालचे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी लावलेल्या रोपांची योग्य निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि वन विभागाच्या पुढाकारामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.





