वृक्ष लागवड अभियानांतर्गत लोन प्र. ऊ. येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
सन २०२६-२७ वृक्ष लागवड अभियानांतर्गत मौजे लोन प्र. ऊ., ता. भडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पंचायत समिती भडगावचे माननीय गटविकास अधिकारी सुयोग अंजने साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी खैरनार साहेब, कृषी विस्ताराधिकारी देशमुख साहेब, सिंचन विभागाचे जितेंद्र देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा आढावाही घेण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच अॅड. बी. आर. पाटील, रोजगार सेवक गोरख पवार, माजी सरपंच नाना पवार, ग्रामसेवक अनिकेत पाटील, सुरेश पाटील तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या.
‘एक घर, एक झाड’ उपक्रमातून ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प
यावेळी सरपंच अॅड. बी. आर. पाटील यांनी घरकुल लाभार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘एक घर, एक झाड’ या संकल्पनेतून सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लागवड केलेली झाडे केवळ लावून न ठेवता ती जगविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही सरपंच अॅड. बी. आर. पाटील यांनी दिली.
“वृक्ष लागवड ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी,” असा संदेश यावेळी देण्यात आला.





