IMG 20260810 WA1549

ग्लोबल मिशन स्कूल, बाहुटे येथे दोन दिवसीय पालक सभा उत्साहात संपन्न

73 / 100 SEO Score

ग्लोबल मिशन स्कूल, बाहुटे येथे दोन दिवसीय पालक सभा उत्साहात संपन्न

 

मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवण्याचे प्रमुख वक्ते जयदीप पाटील यांचे पालकांना आवाहन

IMG 20260810 WA1547

पारोळा प्रतिनिधी :-

बाहुटे येथील ग्लोबल मिशन स्कूलमध्ये दोन दिवसीय पालक सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, सर्वांगीण विकास, संस्कार तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक एस. जे. पाटील, प्रमुख वक्ते जयदीप पाटील, प्राचार्य उमाकांत बुंदेले, प्रेमराज पाटील, रमेश पाटील तसेच शिक्षक-पालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख वक्ते जयदीप पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांच्या वाढत्या मोबाईल वापराबाबत चिंता व्यक्त केली. “मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे; तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ देऊ नका,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून वेळीच सावध करून योग्य नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर तसेच वाचनाच्या सवयीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ, सर्जनशील उपक्रम आणि वाचनाकडे वळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

“मुलांना दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावा,” असे आवाहनही जयदीप पाटील यांनी केले. वृत्तपत्र वाचनामुळे देश-विदेशातील घडामोडी, सामान्यज्ञान, भाषा आणि समाजजीवनाची माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसीय पालक सभेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडू शकते, असा संदेश या पालक सभेतून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्लोबल मिशन स्कूलमधील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले. त्यानंतर दोन दिवसीय पालक सभेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top