शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्रावर टोकन वाटप करतांना गोंधळ; चेगराचेंगरीत तीन शेतकरी,जखमी,शेतकी संघाचा भोंगळ कारभार,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

img 20260408 wa0631

शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्रावर टोकन वाटप करतांना गोंधळ; चेगराचेंगरीत तीन शेतकरी,जखमी,शेतकी संघाचा भोंगळ कारभार,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

भडगाव प्रतिनिधी :-

शासकीय ज्वारी व मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी भडगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेले असताना टोकन वाटप करताना अचानक उडालेल्या गोंधळामुळे चेगराचेंगरी होऊन दोन ते तीन शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळेस पोलिसांनी सौम्य लाठीमार केला यात काही शेतकऱ्यांची डोकी फुटल्याचे दिसून आल्याने या सर्व प्रकारास शेतकरी सहकारी सघाचा भोगळ कारभार कारणीभुत असुन याबाबत शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार 12 – 30 ते 1 वाजेच्या दरम्यान घडला.

शासकीय ज्वारी व मका ऑनलाईन खरेदी नाव नोंदणीसाठी शेतकरी शेतकरी संघाच्या आवारात दिनांक सहा एप्रिल पासूनच सकाळपासून गर्दी केलेली होती. मात्र सहा एप्रिल रोजी सायंकाळ पर्यत शासकीय खरेदी नाव नोदणी बाबत शेतकरी सघास कोणतेही आदेश प्राप्त झाले नव्हते. ते आदेश सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. तर रात्री 250 ते 300 शेतकऱ्यांनी रात्री शेतकी संघाच्या आवारातच रात्री मुक्काम केला होता. तर आज सकाळी नाव नोदणी साठी 800 ते 1000 शेतकर्यानी शेतकरी सघ आवारात गर्दी केली होती. काल संध्याकाळी अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर नोंदणी सुरु करुन शेतकऱ्यांना टोकन देण्यात येत होते.

यावेळी शेतकऱ्यांच्या सहमतीने टोकन वाटप होत असताना टोकन वाटप करताना एकच त्यांचा गोधळ उडाला भोंगळ कारभार दिसून आला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात बॅरिकेट न लावता मोकळ्या जागेतच सर्व शेतकरी उभे राहून टोकन मागत होते यावेळी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक टोकन देत असलेल्या खिडकीजवळ गोंधळ उडाला या गोंधळात मोठ्या प्रमाणात चेगराचेगरी झाली यावेळी जवळपास दोन ते तीन शेतकरी जखमी झाल्याची देखील सांगितले जाते एका शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यास दवाखान्यात खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या लाठीभरात काही शेतकऱ्यांची डोकी फुटल्याचे सांगितले जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर शेतीकरी संघाचे संचालक अमोल पाटील, योजना ताई पाटील, प्रभाकर पाटील, जे के पाटील हिरामण पाटोळे, राजेद्र परदेशी, नागेश वाघ सह अन्य संचालकानी यावेळी भडगाव पोलीस स्टेशन विभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूरवाड साहेब यांची भेट घेऊन या ठिकाणी झालेल्या प्रकाराबद्दल पोलिस अधिकाऱ्याची चर्चा केली. या चेगरा चेगरीत अजय राजेंद्र बडगुजर, वय 26, सजय शाताराम पाटील वय 48, भुषण लाल्मीक वाघ वय 26 हे जखमी झाले आहेत त्याच्यावर प्राथमिक उपचार नतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुगणालयात पाठविण्यात आले आहे.

*वाटप केलेले सर्व टोकन रद्द*

रब्बी हगाम 2025 – 2026 मध्ये नोदणी सुरु असताना नोदणी वेळी गोधळ उडाल्याने काही अज्ञात लोकांनी टोकन गहाळ केले आहेत. त्यामुळे शेतकरी सहकारी सघ कडुन देण्यात आलेले सर्व टोकन रद्द करण्यात येत असुन. नविन नाव नोदणीची तारीख वरीष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊनलवरच प्रसारमाध्यमातुन कळविण्यात येईल असे शेतकरी सघाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

शासकीय ज्वारी व मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अद्याप नाव नोदणी पोर्टल सुरु झाले नसल्याची माहीती मिळत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!