बालविकास प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे ‘यशोत्सव २०२६’ बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

बालविकास प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे 'यशोत्सव २०२६' बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
68 / 100 SEO Score

बालविकास प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे ‘यशोत्सव २०२६’ बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.!!!

गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्कारांचे वितरणबालविकास प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे 'यशोत्सव २०२६' बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

भडगाव येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिरामध्ये शनिवार, दिनांक १८ एप्रिल रोजी शाळेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. वर्षभर विविध उपक्रमांमध्ये आणि हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर यावेळी मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली.

या दिमाखदार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून भडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रावसाहेब पाटील साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊसो श्री. विजय लक्ष्मण महाजन, संस्थेच्या सचिव सौ. रोहिणीताई महाजन, सहसचिव श्रीमती रेखाताई महाजन, संचालक शिवदास महाजन आणि संचालक श्री.प्रकाश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच पालक सभेचे उपाध्यक्ष श्री. देविदास कुंभार, पत्रकार श्री. निलेश महाले आणि बहुसंख्येने जागरूक पालक या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती विठ्ठल रामकुवर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या वर्षभराच्या शैक्षणिक व सहशालेय प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.

क्रीडा विजेते आणि ‘आदर्श विद्यार्थ्यांचा’ सन्मान

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते हिवाळी क्रीडा स्पर्धेतील विजेते आणि शाळेचे ‘आदर्श विद्यार्थी’. हिवाळी क्रीडा स्पर्धेत मैदानावर गाजलेल्या विजेत्यांना मा. गटशिक्षणाधिकारी श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तसेच, इयत्ता ४ थी मधील दक्ष गजेंद्र पाटील आणि गायत्री जितेंद्र बडगुजर या गुणवान विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा क्षण विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत अभिमानाचा होता.

यावेळी गटशिक्षणाधिकारी मा. रावसाहेब पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष भाऊसो श्री. विजय महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन

या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल बिऱ्हाडे यांनी केले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्रीमती सुनिता सूर्यवंशी, श्रीमती अर्चना खांडेकर, श्री. विकास झोडगे, श्री. सागर महाजन, श्री सचिन महाजन, श्रीमती अंजली सोनवणे, श्रीमती रेखा महाजन, श्रीमती रेखा पाटील आणि श्रीमती सुजाता महाजन तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या यशाचा हा आनंदोत्सव पाहण्यासाठी पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *