IMG 20260728 WA1708

तांदुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी.!!!

57 / 100 SEO Score

तांदुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी.!!!

भडगाव प्रतिनिधी :

भडगाव–चाळीसगाव मार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी सुमारे ६:३० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी आयशर चालकाविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर गाडी (क्र. एमएच-५४-०१३१) चालक अरबाज शाफिक मन्यार (रा. यशवंत नगर, भडगाव) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोर असलेल्या दुचाकी (क्र. एमएच-१९-डीयू-४१९५) ला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत धनराज भगवान निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक प्रशांत पंडित एरंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी मयताचे काका पंडित शामजी निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक अरबाज शाफिक मन्यार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४ व १८४ अन्वये भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top