राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव तालुक्याचे घवघवीत यश; ९ पदकांची कमाई, ९ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
भडगाव प्रतिनिधी :-
दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग निवड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भडगाव तालुक्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ६ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ९ पदके पटकावली. या यशामुळे भडगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील बलाढ्य खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत भडगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सुवर्णपदक विजेते:
हितेश जगन्नाथ सोनवणे, अझर शेख अयाज, रेहान नाझिम मिर्झा, सचिन नाना पाटील, जय सुनील हिरे आणि शिफा फिरोज पिंजारी.
रौप्यपदक विजेते:
अफ्फान शेख मोईद्दीन आणि सादिया कौसर झाकीर खान.
कांस्यपदक विजेता:
आर्यन निलेश ब्रह्मणकर.
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंची दि. २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, भडगाव तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
स्पर्धेदरम्यान रेफरी म्हणून चेतन हिरे, अबूझर मिर्झा, दीपक चौहान, प्रेम देवरे आणि तनवीर मन्यार यांनी जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून शाहरुख मन्यार (चाळीसगाव), सचिव अयान खान, तर भडगावचे मुख्य प्रशिक्षक अबरार खान सर यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या यशामागे जिल्हाध्यक्ष हाजी झाकीर कुरेशी, उपाध्यक्ष श्याम पाटील तसेच सौरभ देशमुख आणि संतोष पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
भडगाव तालुक्यातील सर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ते नेत्रदीपक यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





