IMG 20260729 WA0335

आयशरची मोटरसायकलला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

63 / 100 SEO Score

आयशरची मोटरसायकलला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमीIMG 20260728 WA1708

कजगाव, प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील कजगावजवळ तांदुळवाडी–हिंगोणे परिसरातील महामार्गावर मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले एक जण गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, घुसर्डी (ता. भडगाव) येथील रहिवासी धनराज विठ्ठल निकुंभ (वय ५२) व डॉ. एरंडे हे दोन जण मोटरसायकल (क्र. MH 19 DU 4195) वरून चाळीसगावहून कजगावकडे येत होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. MH 54 0131) त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत धनराज निकुंभ यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ. एरंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की धडकेनंतर मोटरसायकल आयशरच्या बंपरमध्ये अडकली होती. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्या आहे

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top