IMG 20260719 WA1326

कजगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; ७ ते ८ नागरिक जखमी, तातडीने बंदोबस्ताची मागणी

61 / 100 SEO Score

कजगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; ७ ते ८ नागरिक जखमी, तातडीने बंदोबस्ताची मागणी

भडगाव ता. प्रतिनिधी आमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव) येथे गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ७ ते ८ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,

संबंधित प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातील पत्रकार संजय महाजन हे मोटारसायकलने जात असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याशिवाय आणखी ५ ते ७ नागरिकांनाही कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.गावात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top