Screenshot 20260720 143909

राजवाडे संशोधन मंडळातर्फे शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा; शतक महोत्सवाची होणार नांदी

55 / 100 SEO Score

राजवाडे संशोधन मंडळातर्फे शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा; शतक महोत्सवाची होणार नांदी

धुळे  प्रतिनिधी

इतिहास संशोधन क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष “कृतज्ञता गौरव सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडणार असून, या कार्यक्रमातून मंडळाच्या आगामी शतक महोत्सवाची वाटचाल सुरू होणार आहे.

संस्थेच्या वाटचालीत शरद पवार यांनी सातत्याने मोलाचा पाठिंबा व भक्कम आधार दिल्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पाटील व कार्याध्यक्ष संजय मुंडडा यांनी दिली.

मागील शंभर वर्षांपासून इतिहास संशोधन, जतन, संवर्धन व ग्रंथप्रकाशन अशा विविध क्षेत्रांत राजवाडे संशोधन मंडळ उल्लेखनीय कार्य करत आहे. या कार्याला शरद पवार यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने संस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे मंडळाने नमूद केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे यांच्या हस्ते विविध दुर्मीळ ऐतिहासिक वस्तूंचे हस्तांतरण व ग्रंथप्रकाशनाचे कार्यक्रम होणार आहेत.

या सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार सुप्रिया सुळे, शोभाताई बच्छाव, आमदार जयकुमार पाटील, दिलीप वळसे पाटील, अमरीशभाई पटेल, सत्यजित तांबे, अनूप अग्रवाल, रामजी भांगरे, मंजुळाताई गावित, धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास इतिहासप्रेमी, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष संजय मुंडडा, स्वागताध्यक्ष अशोक जैन तसेच स्वागत समितीच्या सदस्यांनी केले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top