IMG 20260718 WA1461

नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य; एकवीरा नगर–तळणी तलाव रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

55 / 100 SEO Score

नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य; एकवीरा नगर–तळणी तलाव रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक ८ मधील बाळद रोडलगत एकवीरा नगर ते तळणी तलाव या मार्गावरील काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा दर्जेदार रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, दळणवळण अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार आहे. तसेच या भागाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई मालचे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र जिभू पाटील, शिवसेना गटनेते लखीचंद भाऊ पाटील, प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षाताई पाटील, नगरसेवक युवराज पाटील यांच्यासह जगन भोई, देवा आहिरे, डॉ. विजयकुमार देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, जितेंद्र आचारी, विजयकुमार भोसले, आबा चौधरी, जहांगीर मालचे, राहुल ठाकरे, नाना हाडपे, महेंद्र ततार, मिलिंद बोरसे, दीपक सोनार, नयन भोसले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहरात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यास नगरपरिषदेने प्राधान्य दिले असून प्रत्येक प्रभागात विकासकामांचा वेग कायम ठेवला जाईल, अशी ग्वाही दिली. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करत भडगाव शहराला अधिक सुबक, आधुनिक आणि सुविधायुक्त बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

भूमिपूजनानंतर नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top