IMG 20260718 WA1511

भडगाव ग्राम महसूल अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

58 / 100 SEO Score

भडगाव ग्राम महसूल अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर

भडगाव  प्रतिनिधी :-

भडगाव तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये श्री व्ही. सी. पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून श्री व्ही. पी. शिंदे व श्री एस. के. मांडोळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तसेच श्री एस. व्ही. सोनवणे यांची सचिवपदी, चेतन बैरागी यांची सहसचिवपदी, श्री अविनाश जंजाळे यांची कार्याध्यक्षपदी, तर प्रशांत कुंभारे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून वृषाली सोनवणे, जानराव, अनिता सुतार आणि शीतल राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मंडळ अधिकारी दिनेश येडे, मंडळ अधिकारी अनिल निकम, इंदिरा गांधी योजना मंडळ अधिकारी श्री व्ही. के. माने यांच्यासह तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top