IMG 20260716 WA1117

शेतकरी शिवसेना भडगाव तालुकाध्यक्ष पदि सोमनाथ पाटील.मिञ परीवारामार्फत सत्कार.

56 / 100 SEO Score

शेतकरी शिवसेना भडगाव तालुकाध्यक्ष पदि सोमनाथ पाटील.मिञ परीवारामार्फत सत्कार.

भडगाव वार्ताहर —

तालुक्यातील बोदर्डे येथील आदर्श शेतकरी सोमनाथ भालचंद्र पाटील यांची शेतकरी शिवसेना भडगाव तालुका प्रमुख पदि यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती राज्याचे शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंञी ना. एकनाथ शिंदे, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे. शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल रंगराव पाटील ( पाचोरा ) यांची नियुक्ती पञावर सही आहे. हे नियुक्ती पञ शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा सोमनाथ पाटील यांच्याकडुन आहे.

शेतकरी शिवसेनेच्या भडगाव तालुका प्रमुख पदि बोदर्डे येथील आदर्श शेतकरी सोमनाथ पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल भडगाव येथे त्यांचा मिञ परीवारामार्फत शाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे संचालक अमोल पाटील, संचालक गुलाब पाटील, शिवसेना तालुका संघटक रवि पाटील, वाक येथील माजी उपसरपंच कुणाल पाटील, पञकार अशोक परदेशी , वाक येथील निळु पाटील यांचेसह मिञ परीवार उपस्थित होते. हा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम भडगाव येथील महेश डोर अॅंड प्लाय या दुकानावर करण्यात आला. यावेळी सोमनाथ पाटील यांना निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top