file 00000000451c720880256c709c53efa5

भडगाव नगरपरिषदेकडून मालमत्ता कर तक्रारी स्वीकारण्यास प्रारंभ; ३० जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन.!!!

57 / 100 SEO Score

भडगाव नगरपरिषदेकडून मालमत्ता कर तक्रारी स्वीकारण्यास प्रारंभ; ३० जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषदेने मालमत्ता कर वाढीबाबत नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दि. १५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत मालमत्ता करासंदर्भातील तक्रार अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या कालावधीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी (स्पॉट व्हेरिफिकेशन) करून नियमानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

दिनांक ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या भडगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नागरिकांकडून वाढीव मालमत्ता कराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार विषय क्रमांक ४ वर चर्चा होऊन नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला.

मुख्याधिकारी स्वालिहा मालेगावे , नगराध्यक्षा रेखाताई मालाचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जीभू पाटील तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांच्या सर्वानुमते हा निर्णय मंजूर करण्यात आला.

नगरपरिषद प्रशासनाने भडगाव शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी ३० जुलै २०२६ पूर्वी कर वसुली विभागात आपले तक्रार अर्ज सादर करून या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भडगाव शहरातील माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे नगरपरिषद कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन गटनेते तथा नगरसेवक लखीचंद प्रकाश पाटील यांनी केले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top