IMG 20260704 WA0914

बांबरुड पाटस्थळ येथील स्व. जिजाबाई (कोंडामाई) परदेशी यांच्या स्मरणार्थ ५७७ वृक्षांचे वृक्षारोपण

63 / 100 SEO Score

बांबरुड पाटस्थळ येथील स्व. जिजाबाई (कोंडामाई) परदेशी यांच्या स्मरणार्थ ५७७ वृक्षांचे वृक्षारोपणIMG 20260704 WA0915

भडगाव प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बांबरुड पाटस्थळ येथील स्वर्गवासी जिजाबाई उर्फ कोंडामाई संतोषसिंग परदेशी यांचे दिनांक १७ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस चिरंतन अभिवादन म्हणून कानोबा महाराज (कानिफनाथ महाराज) मंदिर परिसरात , टेकडीवर ५७७ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात वड, पिंपळ, निंब यांसारख्या पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. “एका व्यक्तीच्या स्मृतीला निसर्गसंवर्धनाची जोड देत भावी पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करणे” हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

यावेळी पूर्ण बांबरुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्व. कोंडामाई यांचे चिरंजीव मा. रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी (पोलीस अधीक्षक, एसआरपीएफ, पुणे), डॉ. अरुणा राजपूत (कृष्णा हॉस्पिटल, सिल्लोड), डॉ. करूणा संतोषसिंग परदेशी, श्री. दिनकर कौतिक पाटील, श्री. जितेंद्र जयसिंग परदेशी, श्री. अक्षय संजय परदेशी, श्री. मनोज परदेशी तसेच परदेशी परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून स्व. कोंडामाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले असून, “स्मृती अमर राहतात, जेव्हा त्या निसर्गाच्या रूपाने फुलतात” असा भाव यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top