IMG 20260630 WA1562

गोंडगाव प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी; न्याय न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन छेडणार – भाजपचा इशारा.!!!

55 / 100 SEO Score

गोंडगाव प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार अपयशी; न्याय न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन छेडणार – भाजपचा इशारा.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव येथील अटल भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरण पुन्हा ऐरणीवर आणत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. गोंडगाव प्रकरणातील पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, न्यायप्रक्रियेला गती न मिळाल्यास भडगाव तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते अनिल वाघ यांनी नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणात विशेष जलदगती न्यायालयाने अवघ्या ६० दिवसांत दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायव्यवस्था तसेच महायुती सरकारचे अभिनंदन केले. अशा जलद आणि कठोर निर्णयामुळे समाजातील विकृत प्रवृत्तींना मोठा धडा मिळेल आणि पीडित कुटुंबांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.

यावेळी भाजप भडगाव भाजपा नेते अनिल वाघ यांनी गोंडगाव प्रकरणाचा उल्लेख करत स्थानिक आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये गोंडगाव येथे सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण भडगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. सर्वपक्षीय मोर्चे, व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेला बंद आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनांमुळे या प्रकरणाने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.

त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करत नेरकर यांनी सांगितले की, स्थानिक आमदारांनी या विषयावर विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवला नाही. उलट पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत भाजपच्या वतीने काही थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले. गोंडगाव प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्षात जलदगती न्यायालयात सुरू आहे का? विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे का? जनतेची दिशाभूल करण्यासाठी केवळ राजकीय घोषणा करण्यात आल्या का? तसेच इतर ठिकाणच्या प्रकरणांप्रमाणे गोंडगाव प्रकरणात प्रभावी पाठपुरावा करण्यात स्थानिक आमदार का अपयशी ठरले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

भाजप नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गोंडगाव प्रकरणातील पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, हीच पक्षाची भूमिका आहे. प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गती वाढवून दोषींना कठोर शिक्षा मिळवून द्यावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुक्यात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे नेते अनिल वाघ, तालुकाध्यक्ष विनोद देविदास नेरकर, सोमनाथ पाटील, नगरसेवक सचिन चोरडिया, योजना पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील सुशिलाताई पाटील, शहराध्यक्षा योगीता वाघ, किरण शिंपी, शुभम सुराणा, आबा महाजन, नगरसेवक मुरलीधर मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top