IMG 20260626 WA1065

भडगाव शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामाजिक सलोख्याची परंपरा आजही कायम.!!!

67 / 100 SEO Score

भडगाव शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामाजिक सलोख्याची परंपरा आजही कायम.!!!

IMG 20260626 WA1066

भडगाव – जावेद शेख :-

हिंन्दू – मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले भडगाव शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामाजिक सलोखा, बंधुता आणि ऐक्याची परंपरा आज ही कायम असून, यावर्षीही मोहरम सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 

शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहरमच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करत शांतता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

शहरातील बाडी मोहल्ला येथून निघणारी आर. आर. पाटील यांची सवारी जिल्हाभर प्रसिद्ध आहे. गेल्या सुमारे ८० वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात आहे. ही सवारी बाडी मोहल्ल्यातून निघून जलाली वाडा मार्गे पुन्हा बाडी मोहल्ल्यात परतते.

 

यावेळी आर. आर. पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मुस्लिम पंच कमिटी तसेच गावातील हिंदू-मुस्लिम समाजातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येते . या उपक्रमातून सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top