IMG 20260626 WA1115

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक लोन पिराचे येथे मोहरम उत्साहात साजरा.!!!

61 / 100 SEO Score

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक लोन पिराचे येथे मोहरम उत्साहात साजरा.!!!IMG 20260626 WA1114

भडगाव ता.प्रतिनिधी :अमीन पिंजारी

भडगाव तालुक्यातील कजगावजवळ असलेल्या लोन पिराचे येथे सालाबादप्रमाणे मोहरम उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त २४ तारखेला सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. तसेच २६ तारखेला दर्गा परिसरात दुपारी १२ वाजता भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध समाजातील नागरिक, भाविक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.

लोन पिराचे हे गाव जळगाव जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गावात हजरत गैबनशाह वली बाबा आणि फकीरा बाबा यांचे प्राचीन दर्गे असून, या दर्ग्यांची देखरेख पाटील कुटुंबाकडून केली जाते. सुमारे ८०० ते ९०० वर्षांची परंपरा आजही जतन करण्यात येत आहे.

मोहरम उत्सवानिमित्त दरवर्षी हिंदू व मुस्लिम समाजातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येत असतात. विशेष म्हणजे गावात मुस्लिम समाजाचे केवळ एकच कुटुंब वास्तव्यास असूनही सर्व समाजबांधव एकत्र येऊन मोहरम उत्सव साजरा करतात. परस्पर आदर, बंधुभाव आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श या गावाने जपला आहे.

श्रद्धा, आपुलकी आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देणारे लोन पिराचे हे गाव भडगाव तालुक्यासह जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. या गावाच्या सामाजिक एकोपा व ऐतिहासिक परंपरेची दखल घेऊन शासनाने लोन पिराचे गावाला ‘आदर्श गाव’ म्हणून गौरवून विशेष पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top