काळाचौकी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर

61 / 100 SEO Score

काळाचौकी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरIMG 20260625 WA0169

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोमवार, २२ जून २०२६ रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. काळाचौकी पोलीस ठाणे येथे पार पडलेल्या या शिबिराला पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

शिबिरात डॉ. प्रागजी वाजा, डॉ. वैशाली शेलार, डॉ. सुनीता निकम, डॉ. शशिकांत पवार, डॉ. अजय पुरी, डॉ. मुकुंद धोत्रे, डॉ. गुलाब गुप्ता आणि डॉ. रोहन राम ठाकूर यांनी वैद्यकीय सेवा दिली.

कार्यक्रमास माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, विभागीय नगरसेविका सुप्रिया दळवी आणि मनसेच्या पदाधिकारी ग्रेसी सिंग यांची उपस्थिती लाभली. महिला पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सागर बनकर तसेच सपोनि हसन मुलाणी उपस्थित होते.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!