Don't miss our holiday offer - up to 50% OFF!

हिंदू हृदय सम्राट वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी.!!!
हिंदू हृदय सम्राट वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील कजगाव येथे हिंदू हृदय सम्राट वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याचा व पराक्रमाचा गौरव केला. तसेच त्यांच्या जीवनातील तत्त्वनिष्ठा, शौर्य व देशभक्ती प्रत्येकाने अंगीकारावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास माजी सरपंच दिनेश पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, समाज बांधव आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.



