IMG 20260520 WA0906

ऑनलाईन औषध विक्री व इ-फार्मसी विरोधात भडगाव तालुक्यात कडकडीत बंद; १६० मेडिकल दुकाने पूर्णतः बंद ठेवत केमिस्ट बांधवांचा सहभाग

ऑनलाईन औषध विक्री व इ-फार्मसी विरोधात भडगाव तालुक्यात कडकडीत बंद; १६० मेडिकल दुकाने पूर्णतः बंद ठेवत केमिस्ट बांधवांचा सहभाग.!!!

IMG 20260520 113818 537

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या वतीने ऑल इंडिया देशव्यापी एकदिवसीय केमिस्ट शॉप बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे तसेच जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता.

या बंदमध्ये भडगाव तालुक्यातील तब्बल १६० केमिस्ट बांधवांनी शंभर टक्के मेडिकल दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. शहरासह ग्रामीण भागातील मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिल्याने बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

सुरक्षित औषध वितरण व्यवस्था टिकवणे, इ-फार्मसी व बोगस औषध विक्रीला आळा घालणे, ऑनलाईन औषध विक्री बंद करणे, फार्मसिस्टच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित औषध सेवा उपलब्ध करून देणे तसेच रुग्ण सुरक्षा व देशहिताच्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.

सकाळी अकरा वाजता पारोळा चौफुली, भडगाव येथून केमिस्ट बांधवांनी मुक मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदार शीतल सोलाट मॅडम यांना निवेदन देण्यात आले. तसेच भडगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रताप पाटील यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुरेश भंडारी यांनी बंदबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होत असून फार्मसिस्टच्या मार्गदर्शनाशिवाय औषध विक्री होणे अत्यंत धोकादायक आहे. सुरक्षित औषध सेवा टिकवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी सचिव संजय पाटील, शहराध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष महेश पाटील, धनंजय वाणी, हर्षल चौधरी, जगदीश सोनवणे, दिलीप राका, ललित बंब, सुनील चौधरी, आसिफ मिर्झा, गोविंद जाधव, गुणवंत पाटील, संदीप भंडारी, सुहास महाजन, राहुल गंजे यांच्यासह भडगाव तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top