IMG 20260515 WA0968

“तुन्हां प्यारमां दिवानी दिवानी व्हयनुं रे “अहिराणी गाण्याचे सिने अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते प्रकाशन.!!!

“तुन्हां प्यारमां दिवानी दिवानी व्हयनुं रे “अहिराणी गाण्याचे सिने अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते प्रकाशन.!!!

लोहटारच्या एन.एल. परदेशी या तरुणाची चिञपट सृष्टीत झेप. भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी यांनी केले कलाकार टीमचे अभिनंदन.IMG 20260515 WA0968

भडगाव प्रतिनिधी :—

खान्देशी मायबोलीला राष्टीृय व्यासपीठ मिळवुन देणार्या ” तुन्हां प्यारमां दिवानी दिवानी व्हयनुं रे” या अहिराणी सुमधुर गाण्याचे प्रकाशन सदाबहार अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात पार पडले. ‘ स्वर संगीत म्युझिक ‘ या टयुब चॅनलवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अहिराणी गाण्यांचा निर्माता, दिग्दर्शक एन. एल. परदेशी ( नरेश लालचंद परदेशी ) भडगावहुन जवळच असलेल्या लोहटार. ता. पाचोरा. जि. जळगाव येथील या खान्देशातील तरुणाने चिञपट नगरीत झेप घेतली आहे.

या गाण्याची निर्मिती एन. एल. परदेशी यांनी केली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटार या छोटयाशा गावातुन मोठी स्वप्ने घेऊन मुंबई गाठणारे एन. एल. परदेशी आज हिंदी चिञपट सृष्टीत गेली २५ वर्ष प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मेहनत, निष्ठा आणि मायबोलीवरील प्रेम याच्या बळावर त्यांनी फिल्म इंडस्टीृत आपली स्वतंञ ओळख निर्माण केली आहे.या फिल्मी संपुर्ण कलाकार टीमचे भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी यांनी अभिनंदन केले आहे.

 फिल्मालया स्टुडीओ अंधेरी वेस्ट मुंबई येथे चिञपट नगरीचे डायरेक्टर, प्रोडयुसर सुबीर मुखर्जी यांच्याकडे २५ वर्षापासुन प्रोडक्शन कंट्रोलर आणि पर्सल पीए म्हणुन फॅमिली मेंबरसारखे काम पहात आहेत. सुबीर मुखर्जी हे सिने अभिनेञी राणी मुखर्जी व काजल यांचे काका आहेत.

 मुंबईत टिकुन राहणे जितके अवघड तितकेच संघर्षमय. माञ परदेशी यांनी सुरुवातीपासुनच कामाशी इमानदारी, संयम आणि सातत्य ठेवले.याच गुणांमुळे त्यांना मुखर्जी फिल्म प्रोडक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आज ते या संस्थेचा अविभाज्य भाग असुन मुखर्जी कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले आहे. 

       अंधेरी येथील फिल्मालय स्टुडीओमध्ये काम करतांना त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. अभिनय, संगीत किंवा तांञिक क्षेञात संधी शोधणार्या स्टगलर्ससाठी ते आधारस्तंभ ठरलेले आहेत. आज मी जे झालो आहे ते या फिल्म इंडस्टीमुळेच झालो आहे. त्यामुळे नव्या कलाकारांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे ते म्हणतात. 

फिल्म प्रोडक्शनपुर्वी त्यांनी संगीत क्षेञातही उल्लेखनीय काम केले आहे. टी सिरयल सारख्या नामांकीत कंपनीसाठी त्यांनी अहिराणी, आगरी, कोळी, मराठी, भोजपुरी आणि हिंदी भाषेतील साॅंग अल्बम तयार केलेले आहेत. 

       आता त्यांनी स्वर संगीत म्युझिक या स्वताच्या युटयुब चॅनलच्या माध्यमातुन नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे. या चॅनलवरुन त्यांनी अहिराणी भाषेतील भव्य साॅंग अल्बम सादर केला आहे. या प्रकल्पासाठी ३ नामांकीत अहिराणी गायकांना एकञ आणुन विरार, मुंबई व पालघर परीसरातील निसर्गरम्य ठिकाणी चिञीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व खानदेशी कलाकार , तंञज्ञ व नृत्यदिग्दर्शकांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प भावनिक दृष्टयाही म्हत्वाचा ठरला आहे. या अल्बममधील तुन्हां प्यारम्हां दिवानी दिवानी व्हयनुं रे… या गाण्याचे विशेष कौतुक झाले आहे. सदाबहार अभिनेता जितेंद्र यांनी स्वता हे गाणे पाहुन संपुर्ण कलाकार टीमचे अभिनंदन केलेले आहे. या गाण्यानंतर सोडी जासुरे तुन्ही दुनियाले… तसेच नादानं दिलं तुन्हां व्हयना दिवाना दिलं म्हनां हे तिन्ही अहिराणी सुमधुर गाणे रिलीज झालेले आहेत. त्यांनी या कलाकार टीमला घरी बोलावुन घेत आपला पाठींबा देत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी या गाण्याचे अधिकृत रिलीज झालेले आहे.या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.या यशामागे फिल्म निर्माता व फिल्मालया स्टुडीओचे चेअरमन शुभीर मुखर्जी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सुरुवातीपासुन एन. एल. परदेशी यांच्यावर विश्वास ठेवत सातत्याने मार्गदर्शन केलेले आहे.

 या अल्बमच्या तिन्ही गाण्यांमध्ये कलाकार ऋतुजा पाटील, अजय बाविस्कर, तृप्ती गायकवाड , विशाल भोई. कोरिओग्राफर राहुल मेहरे, दिग्दर्शक निर्माता एन. परदेशी हे आहेत. अंधेरीतील फिल्मालया स्टुडिओ चे मालक सुबीर मुखर्जी यांच्या एन परदेशी वर खूप विश्वास आहे, त्यांचे सर्व चित्रपटात एन परदेशी प्रोडक्शन मॅनेजर असतात. गुमनाम द मिस्टरी, रॉकस्टार, ये जवानी दिवानी, क्लब डान्सर. इत्यादी. फिल्मालय स्टुडिओ मध्ये रोज अनेक स्ट्रगलर कलाकार येतात. कोणी अभिनयासाठी, कोणी गाण्यासाठी तर कोणी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संधी शोधत. एन. एल. परदेशी हे अशा कलाकारांसाठी नेहमी आधारस्तंभ राहिले आहेत. स्वतःचा संघर्ष विसरून ते इतरांना मदत करतात, मार्गदर्शन करतात, ओळखी करून देतात. आज मी जे काही आहे ते या इंडस्ट्रीमुळे आहे त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला शक्य तेवढी मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे ते नेहमी म्हणतात. फिल्म प्रोडक्शनमध्ये पूर्णवेळ व्यस्त होण्यापूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रातही मोठे योगदान दिले. टी-सीरिज, कुणाल कंपनी यांसारख्या नामांकित बॅनर्ससाठी त्यांनी अहिराणी, आगरी-कोळी, मराठी, भोजपुरी आणि हिंदी भाषांतील अनेक सॉंग अल्बम तयार केले. त्या काळात त्यांच्या कामाला चांगली दाद मिळाली. मात्र पुढे फिल्म प्रोडक्शनच्या जबाबदाऱ्या वाढल्याने अल्बम निर्मिती थोडी कमी झाली. तरीही मनात एक कोपरा कायम होता जो मायबोलीसाठी काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहत होता. आता त्या स्वप्नाला नवी दिशा मिळाली आहे. स्वर संगीत म्युझिक या स्वतःच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एन. एल. परदेशी यांनी नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या चॅनलचा प्रारंभ त्यांनी आपल्या मायबोली अहिराणी भाषेतील सॉंग अल्बमपासून केला आहे. पुढील टप्प्यात आगरी-कोळी, मराठी, हिंदी अल्बम, वेबसीरिज आणि हिंदी चित्रपट निर्मिती करण्याचा त्यांचा संकल्प आहे. एन. एल. परदेशी यांचा उद्देश आहे कि, खानदेशी कलाकारांनाही बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच मान-सन्मान मिळावा. ही त्यांची भावना आहे. ते फिल्म प्रोडक्शनमधील व्यक्ती वाटत नाही तर तो आपल्या मातीचा अभिमान वाटतो. तरुणांसाठी त्यांचा हा प्रवास परीसरासाठी प्रेरणादायी आहे. लोहटारसारख्या छोट्या गावातूनही मुंबईच्या झगमगाटात आपली ओळख निर्माण करता येते. हे एन. एल. परदेशी यांनी सिनेसृष्टीत राहुन सिद्ध करून दाखवले आहे.त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.

प्रतिक्रीया — 

मी फिल्मलया स्टुडीओ अंधेरी वेष्ट मुंबई चिञपट नगरीचे डायरेक्टर , प्रोडयुसर सुबीर मुखर्जी यांच्याकडे २५ वर्षापासुन प्रोडक्शन कंट्रोलर आणि पर्सनल पीए म्हणुन काम पहात आहे. खान्देशी मायबोलीला राष्टीृय व्यासपिठ मिळवुन देणार्या तुन्हां प्यारम्हां दिवानी दिवानी व्हयनुं रे… या गाण्यासह ३ अहिराणी सुमधुर गाणे स्वर संगीत म्युझिक या युटयुबट चॅनलवर प्रदर्शित झालेले आहेत. या गाण्यांचे प्रकाशन सदाबहार सिने अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या अहिराणी गाण्यांमध्ये , संगीत क्षेञात बाॅलीवुडप्रमाणे आपल्या खान्देशातील अहिराणी भाषेतील मायबोली कलावंतांना संधी मिळावी व मान सन्मान मिळावा. खान्देशी कलाकारांना राष्टीृय, अंतरराष्टीृय व्यासपिठ मिळवुन देणे ही भावना आहे. खान्देशासाठी हा आपल्या मातीचा अभिमान आहे. तरुणांसाठी हे प्रेरणादाई ठरणार आहे. पुढील टप्यात आगरी, कोळी, मराठी, हिंदी अल्बम वेबसिरीज आणि हिंदी चिञपट करण्याचा माझा संकल्प आहे. एन. एल. परदेशी. फिल्म प्रोडक्शन मॅनेजर मुंबई व भुमिपुञ लोहटार. ता. पाचोरा. जि. जळगाव.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top