IMG 20260515 231250 359

शासन आपल्या दारी : नगरदेवळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.!!!

शासन आपल्या दारी : नगरदेवळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.!!!IMG 20260515 231250 359 IMG 20260515 231334 342

विविध योजनांचे 680 हून अधिक लाभ वितरित ; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

नगरदेवळा प्रतिनिधी :-

शासनाच्या विविध योजना आणि महसुली सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नगरदेवळा येथे आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर – टप्पा क्रमांक 1” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पाटील मंगल कार्यालय, नगरदेवळा येथे झालेल्या या शिबिरात महसूल, कृषी, पुरवठा, सामाजिक न्याय, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन आदी 18 विभागांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या.

शिबिराचे उद्घाटन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, पाचोरा पिपल्स बँक संचालक अविनाश कुडे, माजी पंचायत समिती सदस्य मंगलाताई सिद्धार्थ पवार, माजी सरपंच प्रतिक्षा किरण काटकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, माजी उपसरपंच सागर पाटील, पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेश काटकर यांनी केले. मंडळ अधिकारी राहुल पवार यांनी प्रास्ताविक केले तर ग्राम महसूल अधिकारी किरण चव्हाण यांनी आभार मानले.

नागरिकांची कामे झाली पाहिजेत – तहसीलदार विजय बनसोडे

यावेळी बोलतांना तहसीलदार विजय बनसोडे म्हणाले की, शासनाची ही शिबिरे म्हणजे नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रभावी उपक्रम आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य माहिती मिळावी, योजनांचा लाभ सहज मिळावा आणि महसुली कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले की, स्व-गणना मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, प्रगणकांना सहकार्य करावे. तसेच पानंद रस्त्यांची अडवणूक करू नये, अन्यथा भविष्यात शासकीय योजनांच्या लाभांवर परिणाम होऊ शकतो. 2002 व 2024 चे मॅपिंग करून घेण्यासाठी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराजांच्या नावाने योजना तरी लोकांच्या समस्या जागेवर सोडवा – रावसाहेब पाटील

माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी शिबिराच्या नियोजनाचे कौतुक करतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याची परंपरा निर्माण केली होती. त्याच विचारातून शासनाने हा उपक्रम सुरू केला असून, नागरिकांची कामे जागेवरच पूर्ण व्हावीत, हीच या शिबिरामागची भूमिका आहे. दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम गावपातळीवर झाले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ

या शिबिरात विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणावर लाभांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ई-शिधापत्रिका वाटप – 24, विशेष सहाय्य योजना – 41 लाभार्थी, संजय गांधी व यूडीआयडी लाभार्थी – 63, श्रावणबाळ योजना – 41 लाभार्थी, फेरफार नोंदी निकाली – 25, पीएम किसान त्रुटी पूर्तता – 15, सातबारा दुरुस्ती – 5, वारस नोंद – 4, डिजिटल 7/12 वाटप – 130, डिजिटल 8 अ वाटप – 63, विविध दाखले – 239, एसटी महामंडळ NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी – 51, ऍग्रीस्टॅक मंजुरी – 25, पशुसंवर्धन विभागामार्फत चारा लागवड किट – 8 लाभार्थी, भोगवटादार वर्ग 1 आदेश वाटप – 1 यासह कृषी यांत्रिकीकरण, घरकुल, रेशीम शेती उद्योग नोंदणी आदी योजनांबाबतही मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात आले.

18 विभागांचे स्टॉल, 350 हून अधिक नागरिकांची उपस्थिती

शिबिरात महसूल मंडळ नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध विभागांचे 18 स्टॉल उभारण्यात आले होते. जवळपास 350 लाभार्थ्यांनी शिबिराला भेट दिली असून एकूण 680 विविध लाभ नागरिकांना वितरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा ठरले शिबिर

शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या अडचणी जागेवर सोडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांनी सांगितले. “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे हे शिबिर असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी मंडळ अधिकारी राहुल पवार, तलाठी तात्यासाहेब सपकाळ, तलाठी आप्पा खैरनार, तलाठी संदीप पोळ, तलाठी उमेश सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र शिरसाठ, अतुल पाटील, सागर बागुल, बबन मंडले, विठ्ठल बर्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, रेशन दुकानदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top