भडगावात कारमधून आमली पदार्थ जप्त पोलीसांनी दोघांना केली अटक २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांनी एका कारमधून १० पुडी अमली पदार्थ हस्तगत केले आहे. या कारवाईत एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, तालुक्यात अमली पदार्थ हा पहिलाच प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – लक्ष्मी करंकार पोलीस उपनिरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२/०३/२०२६ रोजी ५ वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील रोडाच्या बाजुला लक्ष्मणभाऊ (नारायण) मंगलकार्यलयाचे
जवळ पारोळा येथून एका फीस्टा कारमधून (एम.एच. ०१ बी.बी. २२१६) अमली पदार्थचा (ड्रग्स) साठा भडगावच्या दिशेने येत होता. या माहितीच्या आधारे भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. संशयास्पद कार अडवून पोलिसांनी तिची कसून तपासणी केली असता, त्यात १० पुडी अमली पदार्थ एमडी ड्रग्स आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ कार आणि त्यातील आरोपी योगेश हरी चौधरी, सरगम हरी चौधरी रा. पारोळा, हल्ली मुक्काम भडगाव या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या अंमली पदार्थाची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या दरम्यान पोलिसांनी ४०,००० रुपये अंदाजे किमतीचा प्रतिबंधीत अंमली पदार्थ एम. डी. असलेली तपकिरी रंगाचे १० पॉकिट एकूण पाकिटासह १४ ग्रॅम ३५० मिली इतक्या वजनाचे.
२) १६,९००/-रु किमंतीच्या ५०० रु दराच्या ३३ नोटा २०० रु दराच्या दोन नोटा अशा एकुण ३५ चलणी नोटा,
३) ५,५०,०००/- रु. किमंतीची पांढ-या रंगाची फोर्ट कपंनीची एम एच ० बी बी २२१६ कार कि.अ.
एकूण २,०६,९०० रु किमंतीचा मुद्देमाल, जप्त करण्यात आला आहे. आरोपी -योगेश हरी चौधरी वय ३५ व सरगम योगेश चौधरी वय ३४ दोन्ही रा. आझादचौक पारोळा ह. मु. मेगासिटी परीसर भडगाव यांच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न.८३/२०१६ एन डीपी एस कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २१(ख), २२,२९ प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यात प्रथमच अमली पदार्थ सारख्या घातक अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, यामागे आणखी कोणकोणते मोठे रॅकेट आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपींना भडगाव न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांसाठी हजर केले असता त्यांना २ दिवसाचा रिमांड मिळालेला आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.
