भडगावच्या शुभांगी परदेशी हिचे यश.ठाणे जलसंधारण अधिकारी पदी झाली निवड.
भडगाव प्रतिनिधी :-
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या विविध पदाकरीता भरती साठी परीक्षा घेतली होती.
या परीक्षेत शुभांगी अमोल महेर यांची ठाणे जिल्हा परिषद या ठिकाणी”जलसंधारण अधिकारी”या पदाकरीता निवड झाली आहे . शुभांगी परदेशी, महेर हया भडगांव नगर परीषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांची मुलगी आहे.तर नाशिक येथील सहा आयुक्त सुदाम परदेशी यांची पुतणी आहे .तिच्या या यशा बाबत आमदार किशोर पाटील, यांच्या सह परिसरातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुभांगी परदेशी यांनी डी. वाय . पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ,आकुर्डी पुणे येथुन बीईसिव्हीलची पदवी घेतली असून सध्या नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत निफाड पंचायत समिती येथे सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट म्हणुन कार्यरत होत्या. माञ या भडगावच्या कन्येने नोकरी करीत असतांना पुन्हा जलसंधारण विभागाची परीक्षा देऊन ठाणे जिल्हा परीषद विभागात जलसंधारण अधिकारी या पदावर झेप घेतलेली आहे. या निवडीबद्दल शुभांगी परदेशी यांचे परदेशी, राजपुत, मिणा समाज संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी,
जिल्हा सचिव विनोद महेर , तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद जोनवाळ, उपाध्यक्ष भगवान डेडवाळ यांचेसह जिल्ह्यातील समाजाचे भडगाव तालुका अध्यक्ष अशोक परदेशी, पाचोरा तालुका अध्यक्ष इंदलसिंग गोठवाळ, जामनेर तालुका अध्यक्ष अमोल कायठे, सोयगाव तालुका अध्यक्ष दिलीप मचीये, चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान महेर, कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा तसेच समाजाच्या सर्व कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व समाज बांधवांच्या वतीने शुभांगी परदेशी यांचे पुनच्छ कौतुक करण्यात येत आहे.





