IMG 20260809 WA0580

गोंडगाव विदयालयात वृक्ष लागवड कार्यक्रम.१०० झाडांसह लोखंडी जाळया. वृक्षमिञ नरेंद्र परदेशी यांचे लाभले योगदान.!!!

54 / 100 SEO Score

गोंडगाव विदयालयात वृक्ष लागवड कार्यक्रम.१०० झाडांसह लोखंडी जाळया. वृक्षमिञ नरेंद्र परदेशी यांचे लाभले योगदान.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयात दि.८ रोजी शनिवारी सकाळी बांबरुड प्र. ब. येथील वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी स्वखर्चातुन वृक्ष लागवडीचा स्तुत्यपुर्ण कार्यक्रम राबविण्यात यश मिळविलेले आहे. जेसीपी मशिनने खड्डे खोदुन यात वड, लिंब, पिंपळ, पिंप्री, बकुळ आदि वृक्ष लावण्यात आलेले आहेत. या झाडांना लोखंडी जाळया लावण्याचे काम सुरु आहे. लावलेले एक झाड , उदयाच्या पिढीला अमुल्य भेट या भावनेतुन वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित असल्याचे वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी जाहीर केले. नरेंद्र परदेशी यांचे अनमोल योगदान लाभल्याने विदयालयामार्फत त्यांचे आभार मानन्यात आले. याकामी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे यांचे मार्गदर्शनातुन हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. याकामी नागरीक, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनींचे अनमोल सहकार्य लाभले. वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश या वृक्ष लागवडीतुन देण्यात आलेला आहे.

वृक्ष लागवड विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे, वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी बांबरुड प्र. ब, शशिकांत पाटील, नागरीक, पालकवर्ग, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी आदिंच्या हस्ते लावण्यात आले.वृक्ष लागवडी वेळी मोठा उत्साह संचारल्याचे दिसुन आले.

सुरुवातीस वृक्षमिञ नरेंद्र परदेशी यांचे वडील जयसिंग चतरु परदेशी, आई रामकोरबाई परदेशी, वृक्ष मिञ नरेंद्र परदेशी, जितेंद्र परदेशी, माजी उपसरपंच भिकन परदेशी, सावदे येथील विठ्ठल परदेशी, शरद परदेशी यांचेसह नातेवाईक मंडळी, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील आदिंचा विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार क्रिडाशिक्षक एस. डी. चौधरी यांनी मानले. सामाजीक कार्यकर्ते ललीत मांडोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन वृक्षलागवडीसाठी योगदान देणारे नरेंद्र परदेशी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास सरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील, शिव व्याख्याते दत्तु मांडोळे, सामाजीक कार्यकर्ते विजय साळुंखे, ललीत मांडोळे, राहुल सोनार, पञकार सतीष पाटील, पञकार रतीलाल पाटील यांचेसह नागरीकांनी भेट दिली अन उपस्थितांच्या हस्ते तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनींच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात आली.

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, ए. एम. साळुंखे, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, लिपीक पी. जे. देशमुख, एम. परदेशी, एस. एल. मोरे आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने सहभागी होते.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top