IMG 20260804 WA08661

जागतिक मैत्री दिनानिमित्त दादरमध्ये मराठी साहित्य व कला सेवेचे ३१वे कविसंमेलन संपन्न

63 / 100 SEO Score

जागतिक मैत्री दिनानिमित्त दादरमध्ये मराठी साहित्य व कला सेवेचे ३१वे कविसंमेलन संपन्नIMG 20260804 WA0027

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयात ३१वे कविसंमेलन आयोजित करण्यात आले. जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून उपस्थित साहित्यिक, कवी आणि रसिकांना मैत्रीचा धागा बांधण्यात आला. साहित्य, स्नेह आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात मुक्त विषयावरील स्वरचित कविता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्यिक अभिवादन आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्याचे अभिवाचन अशा तीन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले.

मराठी साहित्य व कला सेवा ही संस्था आपल्या कार्याच्या अकराव्या वर्षात कार्यरत असून गेल्या दशकभरात मराठी साहित्य, काव्य आणि कला क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. नवोदित आणि अनुभवी साहित्यिकांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्यिक सत्रांचा समावेश करण्यात आला.

कविसंमेलनात बालकवयित्री अजया, अदिती अजित नैराळे, अशोक सहदेव सुकाळे, कल्पना बालाजी उबाळे, कल्पना म्हापूसकर, कृपा राकेश म्हात्रे, डॉ. मानसी पाटील, प्रतिभा नवघरे, प्रिया प्रमोद दामले, मीरा वैद्य, विवेक वसंत जोशी, सरोज सुरेश गाजरे, मनोहर वाळिंबे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्याचे अभिवाचनही या कार्यक्रमात सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे आस्वादन राकेश म्हात्रे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मानसी पाटील यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था राकेश म्हात्रे, कृपा राकेश म्हात्रे आणि अदिती अजित नैराळे यांनी केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अशोक सहदेव सुकाळे, राकेश म्हात्रे, विवेक वसंत जोशी आणि मनोहर वाळिंबे यांनी सहकार्य केले.

गुरुदत्त दिनकर वाकदेकर, संस्थापक व अध्यक्ष, मराठी साहित्य व कला सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा साहित्यिक उपक्रम पार पडला. या उपक्रमातून साहित्य, स्नेह, संवाद आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात आला. संस्थेच्या वतीने पुढील कविसंमेलन ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात आली.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top