लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
भडगाव प्रतिनिधी :-
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कमलेश शिंदे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. किरण पाटील सर व श्री. ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी केले.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मराठी तसेच इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील आत्मविश्वासपूर्ण व आकर्षक भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. सुयोग पाटील सर व श्री. हर्षल पाटील सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील संगीता शेलार,सुनीता देवरे,अनिता सैंदाणे श्री अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, हरिचंद्र पाटील, किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव, वक्तृत्वकला आणि महान व्यक्तींच्या विचारांचा आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





