InCollage 20260730 225858492

एरंडोल मतदारसंघात SIR मोहिमेला शंभर टक्के यश; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान नोंदणी अधिकारी व BLO यांचा गौरव.!!!

55 / 100 SEO Score

एरंडोल मतदारसंघात SIR मोहिमेला शंभर टक्के यश; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान नोंदणी अधिकारी व BLO यांचा गौरव.!!!

एरंडोल  प्रतिनिधी :-

एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक १६ एरंडोल येथे विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत मतदारसंघातील सर्व सहा मतदान नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officers) तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी अत्यंत जबाबदारीने व समन्वयाने काम करत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या SIR मोहिमेत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे, तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले. ही प्रक्रिया वेळेत आणि शंभर टक्के पूर्ण झाल्याने प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला.

या मोहिमेत नायब तहसीलदार श्री अमोल बन सांगायो यांनी प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि योग्य मार्गदर्शन करून आपल्या कार्यक्षेत्रातील काम शंभर टक्के पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनीही घराघरात जाऊन नागरिकांशी संपर्क साधत मतदार नोंदणीचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले.

यशस्वी कामगिरीबद्दल आयोजित सत्कार समारंभात मा. श्री मनीषकुमार गायकवाड साहेब, उपविभागीय अधिकारी आणि मा. श्री गोपाळ पाटील साहेब, तहसीलदार यांच्या हस्ते सर्व सहा मतदान नोंदणी अधिकारी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे. अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यामध्ये मतदान नोंदणी अधिकारी आणि BLO यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघभावना, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाने काम करून एरंडोल पारोळा मतदारसंघासाठी आदर्श निर्माण केला आहे.

कार्यक्रमाला मतदारसंघातील सर्व सहा मतदान नोंदणी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

SIR मोहिमेतील ही शंभर टक्के कामगिरी एरंडोल मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी निवडणुकांमध्ये अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी उपलब्ध होण्यास या मोहिमेचा निश्चितच मोठा फायदा होणार असल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top