IMG 20260527 WA1587

बकराईद सणानिमित्त भडगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च,शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे नागरिकांना आवाहन.!!!

बकराईद सणानिमित्त भडगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च,शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे नागरिकांना आवाहन.!!!InCollage 20260527 201054269

भडगाव प्रतिनिधी:-

आगामी बकराईद सणाच्या पार्श्वभूमीवर भडगाव शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भडगाव पोलिस प्रशासनातर्फे शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, भाग तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरातून हा रूट मार्च पार पडला.

या रूट मार्चमध्ये प्रभारी सहायक पोलिस निरीक्षकांसह अधिकारी,उपनिरीक्षक, कर्मचारी, होमगार्ड जवान तसेच विशेष पथकातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस वाहनांचा ताफा आणि पायी फेरीमुळे शहरात पोलिस प्रशासन सतर्क असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा संदेश नागरिकांमध्ये देण्यात आला.

रूट मार्चदरम्यान पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले. संशयास्पद हालचाली किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

बकराईद सणाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. सणादरम्यान शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला.

दरम्यान, भडगाव शहरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत बकराईद सण शांततेत, सौहार्दपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top