Skip to content

उत्राण येथे भव्य बैलगाडा शर्यत; १२ दुचाकी बक्षिसे जाहीर

उत्राण येथे भव्य बैलगाडा शर्यत; १२ दुचाकी बक्षिसे जाहीर

एरंडोल प्रतिनिधी :-

तालुक्यातील उत्राण येथे दिनांक २५ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने ही स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेसाठी तब्बल १२ दुचाकी वाहनांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

भागवत दादा भिकन पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. सतीश अण्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी परिसरातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

ही बैलगाडा शर्यत दोन गटांत होणार आहे. पहिल्या गटात ‘एक आदत – एक बैल मैदान’ तर दुसऱ्या गटात ‘एक दुसा – एक बैल मैदान’ अशा प्रकारे स्पर्धा घेतली जाणार आहे. दोन्ही गटांसाठी प्रत्येकी सहा दुचाकी बक्षिसे ठेवण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

या स्पर्धेला खानदेशातील विविध भागांतील बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. उत्राण, तळई जिल्हा परिषद गटासह संपूर्ण परिसरातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एरंडोल तालुकाध्यक्ष भागवत दादा भिकन पाटील व त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!