IMG 20260812 WA1470

गोंडगाव विदयालयात शिक्षक पालक सभा उत्साहात.!!!

54 / 100 SEO Score

गोंडगाव विदयालयात शिक्षक पालक सभा उत्साहात.

भडगाव प्रतिनिधी :-

रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत माध्यमिक विदयालय गोंडगाव विदयालयात दि. ११ रोजी सकाळी ९ वाजता शिक्षक पालक सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. नन्नावरे सर हे होते.

सुरुवातीस सरस्वती माता प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर विदयार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच श्री. राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, श्री. विक्रम पाटील, श्री.जितेंद्र पाटील, श्री. ललीत मांडोळे व्यासपिठावर उपस्थित होते.याप्रसंगी गावातील पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह पालकांचा, शिक्षक पालक सभेच्या निवड झालेल्या पदाधिकार्यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार विदयालयामार्फत करण्यात आला. तसेच विदयालयात वृक्ष लागवडीसाठी १०० वृक्ष देऊन अनमोल सहकार्य लाभलेल्या बांबरुड प्र. ब. येथील वृक्षमिञ श्री. नरेंद्र परदेशी, खड्डे खोदण्यासाठी जेसीपी मशीनची सोय उपलब्द करुन दिल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच श्री.राहुल पाटील व वृक्ष लागवडीसाठी विशेष सहकार्य लाभल्याबद्दल श्री. शशिकांत पाटील, श्री. जितेंद्र पाटील यांचा विदयालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. एस. आर. पाटील सरांनी केले. सुञसंचलन श्री. एस. आर. महाजन सरांनी केले. तसेच यावेळी शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष पदि श्री. जितेंद्र शालीग्राम पाटील यांची पुनच्छ निवड करण्यात आली. सचीव म्हणुन श्री. एस. आर. पाटील, सहसचीव म्हणुन श्री. विश्वास रंगराव पाटील यांची निवड करण्यात आली.

तसेच यावेळी शिक्षक व पालकांनी विविध विषयांवर चर्चा विनीमय करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातुन विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसाहेब श्री. बी. जी. नन्नावरे सरांनी शाळेत राबविण्यात येणार्या शैक्षणिक व अडीअडचणी मांडुन विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली. खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा पार पडली. आभार श्री. ए. एम. साळुंखे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top