IMG 20260811 WA0737

पत्रकारितेतून समाजकार्याला वाहून घेतलेले धनराज पाटील यांची मराठा महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

59 / 100 SEO Score

पत्रकारितेतून समाजकार्याला वाहून घेतलेले धनराज पाटील यांची मराठा महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

भडगाव : – जावेद शेख

तालुक्यातील पिचर्डे येथील युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप भिकनराव पाटील यांनी त्यांना निवडपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली आहे.

धनराज पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या प्रभावीपणे मांडण्याचे कार्य करीत आहेत. समाजातील उपेक्षित घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासह विविध सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

पत्रकारितेबरोबरच निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता तसेच निसर्गाच्या संरक्षणासंदर्भातील उपक्रमांमध्ये त्यांनी जबाबदारीने योगदान दिले आहे. त्यामुळे सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदाची नवीन जबाबदारी मिळाल्याने महासंघाच्या सामाजिक, शैक्षणिक, संघटनात्मक व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भावना धनराज पाटील यांनी व्यक्त केली.

या निवडीबद्दल भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून धनराज पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top