InCollage 20260811 151151984

 जि.प. प्राथमिक शाळा कन्हेरेच्या शिरपेचात मानाचा तुरा,शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थिनींचे जिल्हा गुणवत्ता यादीत घवघवीत यश.!!!

57 / 100 SEO Score

 जि.प. प्राथमिक शाळा कन्हेरेच्या शिरपेचात मानाचा तुरा,शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थिनींचे जिल्हा गुणवत्ता यादीत घवघवीत यश.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

दि. २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कन्हेरे, ता. पारोळा, जि. जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चार विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

या परीक्षेत गायत्री सुनील पाटील हिने तब्बल २३८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा क्रमांक, तसेच पारोळा तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीसोबतच पूर्वा प्रवीण पाटील हिने २३६ गुण, दक्षता राजू भिल हिने २२८ गुण, तर प्राची कैलास पाटील हिने २१४ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

चारही विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांना लाभलेले शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि विद्यार्थिनींची मेहनत महत्त्वाची ठरली. वर्गशिक्षिका मीना पाटील, ज्योती महाजन, विशाल देशमुख व लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थिनींना परीक्षेच्या तयारीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल मुख्याध्यापक गणेशराव महाजन तसेच शाळेतील शिक्षकवृंद आणि समस्त ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे उल्लेखनीय यश म्हणजे कन्हेरे गावासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. चार विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची आणि स्पर्धात्मक परीक्षेची मोठी क्षमता असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top