IMG 20260806 WA0891

धुळे जिल्ह्यातील १३ गुन्ह्यांतील तब्बल १२.४७ कोटींचे अमली पदार्थ नष्ट; ९,५३६ किलो साठ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट

63 / 100 SEO Score

धुळे जिल्ह्यातील १३ गुन्ह्यांतील तब्बल १२.४७ कोटींचे अमली पदार्थ नष्ट; ९,५३६ किलो साठ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाटIMG 20260806 WA0894

धुळे  प्रतिनिधी :-

धुळे जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलत विविध १३ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे १२ कोटी ४७ लाख ३० हजार ४५० रुपये किमतीच्या ९,५३६ किलो अमली पदार्थांची नियमानुसार व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली. ही कारवाई ४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र एन्व्हायर्नमेंट पॉवर लिमिटेड, रांजणगाव (जि. पुणे) येथे करण्यात आली.

भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” तसेच महाराष्ट्र शासनाच्या अमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा व इतर अमली पदार्थ उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात आला.

यामध्ये उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (HLDDC) मार्फत ३,१५१ किलो तर प्रादेशिक ड्रग डिस्पोजल समिती (RDDC) मार्फत ६,३८५ किलो अमली पदार्थांचा नाश करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ९,५३६ किलो अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

या प्रक्रियेसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि धुळे जिल्हा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनीही ही कारवाई यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

जनतेला आवाहन : अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारची माहिती असल्यास नागरिकांनी धुळे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top