IMG 20260806 WA0136

सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव.परदेशी, राजपुत, मिना सेवाभावी संघटने मार्फत अभिनंदन अन शुभेच्छा.

57 / 100 SEO Score

सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपुत यांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव.परदेशी, राजपुत, मिना सेवाभावी संघटने मार्फत अभिनंदन अन शुभेच्छा.

भडगाव प्रतिनिधी :-

छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात ३१ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपुत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

अशोक राजपूत यांनी १९९२ मध्ये नागपूर येथे उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पनवेल येथून बदलीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली.

उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना २०१० मध्ये पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच २०२२ मध्ये राष्ट्रपतींकडून पोलीस पदकाने गौरविण्यात आले. याशिवाय विविध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ७०० हून अधिक बक्षिसे आणि १५० प्रशस्तीपत्रे त्यांना प्राप्त झाली आहेत.

सामाजिक परदेशी, राजपुत, मीना कार्यकर्ता जिल्हा अध्यक्ष सुरेश परदेशी, जिल्हा सचिव विनोद महेर, भडगाव तालुका अध्यक्ष अशोक परदेशी, पाचोरा तालुका अध्यक्ष इंदल गोठवाल, जामनेर तालुका अध्यक्ष अमोल कायठे, सोयगाव तालुका अध्यक्ष दिलीप मचीये, चाळीसगाव तालुका अध्यक्ष भगवान महेर, कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा तसेच तंटा मुक्ती जिल्हा अध्यक्ष विनोद जोनवाळ, उपा अध्यक्ष भगवान डेडवाल, जिल्हा व तालुक्याचे सर्व कार्यकारणी पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीने , परदेशी राजपूत मीना समाज सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य व मित्रपरिवारामार्फत अशोक राजपुत यांचे अभिनंदन व शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top