IMG 20260803 WA1002

भडगाव नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई पदांसाठी नियुक्तीस मंजुरी

65 / 100 SEO Score

भडगाव नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई पदांसाठी नियुक्तीस मंजुरीIMG 20260803 WA1001 1

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव नगरपरिषद प्रशासनाने अनुकंपा तत्त्वावरील पात्र वारसांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णय व परिपत्रकांनुसार पात्र वारसांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दोन उमेदवारांची शिपाई (गट-ड) पदासाठी नियुक्तीस शिफारस करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार रोहित विजय बाग आणि जयश्री राजेंद्र पवार यांची अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार शिपाई पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व शासनाने निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे, रिक्त पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीसाठी विचारात घेण्यात आली असून, शासनाच्या नियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

भविष्यात या नियुक्तीबाबत कोणताही न्यायालयीन अथवा प्रशासकीय वाद उद्भवल्यास शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

नगरपरिषद भडगावच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र वारसांना दिलासा मिळाला असून, स्थानिक स्तरावर या निर्णयाचे स्वागत होत आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top